मुस्लिम मताने संग्राम जगताप आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले
विधानसभेत मतदान करणारा हिंदु मुस्लिम मतदार अहमदनगर शहरातील किल्याच्या गर्दीत भारतीय म्हणून एकत्र आनंद साजरा करतो आणि आमदाराची मुस्लिम विरोधी भूमिका योग्य नाही ....
26 जानेवारी माझ्या अहमदनगर शहरात म्हणाल तर 76 वा आणि आताच्या अहिल्यानगराचा 1ला प्रजाकसत्ताक दिन शहरातील सर्व जाती धर्माचे लोक जसा अहमदनगर नाव असताना करत होते तसेच नामांतरा नंतर अहिल्यानगरातही मोठ्या उत्साहात साजरा करत होते, अहमदनगरच्या त्या किल्यात जिथे भारताच्या स्वातंत्र्य साठी मौलाना आजाद,वल्लभभाई पटेल,पंडित नेहरू अटक होते. या किल्यात येणारा प्रत्येक व्यक्ति स्री असो वा पुरुष,हिन्दू,मुस्लिम, शिख ईसाई, दलित, आदिवासी नसून हजारों लोकांचा समुदाय प्यूवर भारतीय होता आणि त्यांच्या तोंडावर वर आनंद नी आनंद ओसांडून वाहत होता.याची साक्ष zero news ने टिपलेले वीडियो चित्रिकरण,
अहमदनगरच्या किल्यात जमलेल्या गर्दीतील अनेकांनी लोकशाहीचा मोठा उत्सव लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केलेले होते.कोणी अघाडीच्या तर कोणी युतिला मतदान केलेले असणार,मात्र या अहमद शाह बादशाने वसाविलेल्या अहमदनगर शहरातील किल्याच्या गर्दीत भारतीय म्हणून एकत्र आनंद साजरा करत होते.अनेक बालकाच्या हातात दिसणारे झेंडे कोण्या पक्षाचे नसून तिरंगे होते, हातातील छोटे झेंडे हालवित असणाऱ्या बालकाकडे पाहणाऱ्याच्या लोकांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटत होते.
लोकसभेच्या निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदार संघातुन युतीचेचे भाजप उमेदवार सुजय विखे पराभूत झाले आणि विधानसभेत अहमदनगर विधानसभा मतदार संघातुन युतिचेच राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संग्राम जगताप निवडून आले.
सुजय विखे यांनी लोकसभेच्या पराभवाचे खापर मुस्लिम समाजावर न फोडता भाजपा कडून उमेदवारी करत असलेल्या आपल्या वडिलांचे विधानसभेच्या प्रचारात हिंदू मुस्लिम करणाऱ्याना खडे बोल सुनावले आणि विधानसभेत विजयी झालेले युतिचे आ.संग्राम जगताप हे राष्ट्रवादी कांग्रेस म्हणजे छ. शिवाजी महाराज, फुले,शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारा, पुरोगामी पक्षाचे उमेदवार असताना हिन्दुत्वाचे पुरस्कारते असल्यागत मुस्लिम विरोधी हिरवी वळवळ, जिहादी सातत्याने हेट स्पीच वक्तव्य करत आहे.
आ.संग्राम जगतापांच्या मुस्लिम विरोधी भूमिकेने नगरकरात चर्चा तर होणार,
संग्राम जगताप यांना आमदार पहिल्यांदा निवडून आले ते मुस्लिम मताने, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 3300 मतांनी अनिलभैया राठोड यांचा पराभव झाला.अनिल भैया राठोड यांना 46,061 मते मिळाली तर संग्राम जगताप यांना 49578 मते मिळाली,काँग्रेसचे सत्यजित तांबे उमेदवार असतांना ही मुस्लिम समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी मतदान केले आणि 3300 मताने पहिल्यांदा आमदार झाले.म्हणजे आ.संग्राम जगतापा यांना आमदार मुस्लिम मतदानाने बनविले हा इतिहास आहे.
2019 साली मुस्लिम मतदाराने भरगोस मतदान केल्याने दुसऱ्यादाही अनिल भैया राठोड यांचा 11,339 मतांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप दुसऱ्यादा आमदार झाले.आमदार संग्राम जगताप यांचे बरोबर मुस्लिम कार्यकत्यांचा मोठा वावर होता.2019 निवडणूकी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मोदीलाटेच्या प्रभावामुळे भाजप सेनेच्या रांगेत उमेदवारी साठी असल्याचे चर्चा रंगल्या होत्या.
तिसऱ्यादा आमदार जगताप यांच्या मतदानात मुस्लिम मतांची घट झाली.हे बूथ वरील मतदानाने कळले.हे जरी खरे असले तरी मुस्लिम मतदान झालेच नाही असे म्हणणे योग्य ठरत नाही.या वेळेच्या आघाडीच्या उमेदवारांच्या मतदानात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.हे वास्तव आहे.यात काही मुस्लिम वगळता मोठ्या प्रमाणात मतदार हे हिंदू आहेत.यांच्या विरोधात आ.जगताप हे हिंदू जिहादी म्हणून उल्लेख करणार का? यांचे कोणकोणत्या समाध्या पाडणार ? ज्या मुस्लिम मतदाराच्या मतदानाने आ.जगताप पहिल्यांदा आमदार म्हणून निवडू आला त्या मुस्लिमांनी अल्प मतदान केल्याने त्याचा राग मनात धरत त्यांचा उल्लेख जिहादी द्वेष भावनेने उल्लेख करत आहेत आणि अतिक्रमणाचे नावाखाली कबरी पाडण्यासाठीचे निवेदने आणि इशारे देत आहेत. निव्वळ मुस्लिम मतदान कमी झाल्याने आ.संग्राम जगताप यांचे मुस्लिम समाजाचा रागाराग करणारी भाषा कितपत लोकशाहीत कितपत उचित ठरते. जग जिंकण्यासाठी निघालेला सिकंदर आपल्या जनाजाच्या बाहेर आपले हात ठेवावे असे का सांगतो
तेंव्हा कालचा प्रजाकसत्ताकदिन साजरा करताना किल्यातील भारतीय नागरिक हिंदू मुस्लिम करत न बसत नाही हीच लोकशाही ची खरी ताकत ठरते ,तो धर्म जाणतो आणि समाझतो म्हणूनच निवडणुकीनंतर एकत्र जातीद्वेषाचे घोंगडी बाहेर ठेवत देशोत्सव प्रजाकसत्ताक दिन साजरा करतो. तेव्हा राजकरण्या कडून जातीवाद न करण्याची अपेक्षा ठेवणे यात गैर काय ?
हिंदुत्वाच्या नावाने बाता न मारता सर्व जाती धर्माच्या लोकांना भेदाभेद न करता सोबत बरोबर घेऊन चालव्यास खरे पौरोष्यत्व लागते आणि यालाच राजधर्म म्हणतात
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे सर्व धर्माचे बरोबर घेऊन चालण्याची भूमिका वारंवार जाहीर करत असताना आ.संग्राम जगतापांनी मुस्लिम विरोधात दर्ग्याच्या अतिक्रमण बाबत बोलण्याचा सपाटाच लावला आहे . म्हणून आ.संग्राम जगातापांची मुस्लिम विरोधी भूमिका घेत नवं हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याची भूमिका योग्य वाटत नाही ! ...



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा