औरंग्याची_औलाद
औरंग्याची औलाद... 'औरंग्याच्या औलादी' अशी गरळ ओकणे आता सध्याच्या धर्मांधतेने बरबटलेल्या वातावरणात सर्वसामान्यपणे नित्याचेच झाले आहे. औरंगजेबाला शिव्या घालणे म्हणजे कट्टर हिंदुत्वाचे प्रमाणपत्र मिळवणे इतके गरजेचे झाले आहे. पुरोगामी, परिवर्तनवादी, सुधारणावादी विचारांच्या कार्यकर्त्यांना हिणवण्यासाठी 'औरंग्याची औलाद' हा शब्दप्रयोग जणु काय शिवीसारखा अंमलात आणला जात आहे. 'औरंग्याच्या औलादी' या शब्दांमध्ये औरंगजेबाविषयी इतका तिरस्कार, घृणा, विखार भरलेला आहे कि तो 'शहेनशाह औरंगजेब' एकेकाळचा अफगाणिस्तान ते बंगालचा अनभिषिक्त सम्राट होता हे विसरुन तो गल्लीतला टपोरी मवाली असल्याच्या अविर्भावात त्याला धिक्कारले जात आहे. ज्यांना वस्तीतल्या गुंडाची गचांडी धरताना चड्डी पिवळी होईल अशी भिती वाटते तेसुद्धा औरंगजेबाची अवहेलना करुन मर्दुमकीचा आव आणतात त्याविषयी न बोललेले बरे... औरंगजेब हा त्याकाळातील एक सामर्थ्यवान बादशाह होता त्यामुळे त्याकाळात लोकशाही नसल्याने व निवडणूका होत नसल्याने आपले राज्य वाचवण्यासाठी व वाढवण्यासाठी ज्या काही डावपेच, उपाययोजना करायच्या त्या त्यान...
.jpeg)

