छ.शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील मुस्लिम प्रजेला नेहमीच सुरक्षित ठेवले.


 छ.शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील मुस्लिम प्रजेला नेहमीच सुरक्षित ठेवले.


त्यांनी मस्जिद आणि दर्गे यांना कोणताही त्रास होऊ दिला नाही.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महान योद्धेच नव्हे, तर एक दूरदृष्टी असलेले प्रशासक होते. त्यांचे राज्य धर्माधारित नसून, न्याय आणि सुव्यवस्थेवर आधारलेले होते. त्यामुळेच, त्यांच्या राज्यातील हिंदू आणि मुसलमान दोघांनाही समान वागणूक मिळत असे.

शिवाजी महाराजांनी कधीही धर्माच्या आधारे भेदभाव केला नाही. त्यांच्या सैन्यात तसेच प्रशासनातही मुसलमान मोठ्या प्रमाणात होते. त्यांचे धोरण धर्मनिरपेक्ष होते आणि त्यांना सर्व समाजगटांचा पाठिंबा हवा होता.

मुसलमान सरदार आणि अधिकाऱ्याचा मोठया प्रमाणात भरणा होता. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुसलमान सरदार महत्त्वाच्या पदांवर होते.

सिद्दी इब्राहिम – तोपखान्याचा प्रमुख होता.

दौलतखान – नौदलात महत्त्वाची भूमिका बजावणारा अधिकारी.

मुसा खान – तोफखान्याचा तज्ज्ञ.

मदारी मेहतर – महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार.

 मुस्लिम प्रजा आणि त्यांचे संरक्षण बाबत म्हणायचे झाले तर शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील मुस्लिम प्रजेला नेहमीच सुरक्षित ठेवले.

त्यांनी मस्जिद आणि दर्गाह यांना कोणताही त्रास होऊ दिला नाही.

त्यांनी कधीही मुसलमान धर्मस्थळांना धक्का लावला नाही.महाराजांच्या सैन्याने जेव्हा कोणी मुस्लिमांचा पराभव केला, तेव्हा त्यांनी कुराण आणि इतर धार्मिक ग्रंथ सन्मानाने परत करण्याचा आदेश दिला होता. हे त्यांचे सर्वधर्मसमभावाचे मोठे उदाहरण आहे. आणि शिवाजी महाराजांच्या नावाने आज महाराष्ट्रभर मुस्लिम द्वेषाचे राजकारण सत्ताधारी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन करतात.

याच महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील पुसेसावली येथील मशिदीत नुरुल हसन शिकलकर नावाचा तरुण मारला गेला.पवित्र कुराणाच्या प्रती जाळल्या गेल्या.

मुस्लिम विरोधी २९ टक्के घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत.छ. शिवाजी महाराज शाहू-फुले- आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या, स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या या राज्याने या वर्षाचा बहुतेक काळ हा मुसलमानांचं खच्चीकरण करण्यासाठी सत्ताधाऱ्यानी मागील दीड दोन वर्षे घालवलाय. द्वेषपूर्ण भाषणांच्या सपाटाच लावला होता, 52 पेक्षा जास्त सकल हिंदू संघटनेचे मोर्चातील द्वेषपूर्ण भाषणातून म्हणजे  म्हणजे फक्त मुस्लिम द्वेष. देशातील एकूण द्वेषपूर्ण परिस्थिती पाहता २९ टक्के घटना  या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत आणि निरपराध मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींना स्त्री असो वा पुरुषांना खोट्या फिर्यादीत नोंदवून गुन्ह्यात अडकले जाते आणि कोर्टात जामीन मिळू दिला जात नाही. 

छ  शिवाजी महाराज,शाहू-फुले- आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या,  पुरोगामी महाराष्ट्र राज्यातमुसलमानांचं द्वेषाचे राजकारण

 या वर्षाभरताच्या   काळत  हा मुसलमानांचं द्वेषाचे राजकारण मोठ्या प्रमाणात करण्यात आले  आणि मुस्लिमांच्या खच्चीकरण करण्यासाठी खास कार्यक्रम राबविण्यात आले. राज्यात चार मुस्लिम तरुण बळी ठरले.या परिस्थितीचा अर्थ कसा लावायचा हे  कळत नाही. महाराष्ट्र राज्यात  ही अतिशय वेदनादायी परिस्थिती आहे.

सातारा जिल्ह्यातील पुसेसावलीचा मारला गेलेला युवक,अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील युवक,नाशिक जिल्ह्यातील कथित गोवंश तस्करीच्या नावाखाली होणारे हत्याकांड,शेवगावातील मशीदवर होणारी दगडफेक, संगमनेर येथील दगडफेक,मनोरी येथील मशिदीच्या तोडफोड नंतर फिर्यादी वरच दाखल होणारे खोटे गुन्हे कोळगाव थंडी येथील मशिदीतील फाडले गेलेले कुराणच्या प्रती,मशिदीत कुराण फाडले गेले नाहीत.सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले नाहीत असा पोलिसांचा वेगळाच कयास .एक ना अनेक मुस्लिमा वरील अन्याय आणि अत्याचाराची  प्रकरनाने मुस्लिम अल्पसंख्याक  दहशती खाली जगत आहेत. 

एवढे सारे घडत होते ते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी साठी, निवडणूका झाल्या नंतर सगळे शांत होईल असे वाटले पण झाले नाही, मात्र मुस्लिमावरील अन्याय  अत्याचार आता पुरोगामी म्हणविणाऱ्या पक्षाचे आमदार भाजपाच्या मंत्री  राजरोसपणे द्वेषयुक्त वक्तव्य करत   असे सभा करत आहे.

महायुतीच्या राज्यांमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीविषयी काय सांगायचे  इथे पोलीस उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी कितीही टोकाची द्वेषपूर्ण भाषणं केली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य धर्माधारित नव्हते, तर न्याय, समानता आणि लोककल्याण यावर आधारित होते. त्यांनी सर्व धर्मांच्या लोकांना सन्मान आणि संधी दिली. 

आज काही लोक स्वार्थासाठी इतिहासाचा विपर्यास करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात, पण शिवरायांचे खरे विचार समजून घेतले तर हे स्पष्ट होते की ते सर्वसमावेशक आणि न्यायप्रिय शासक होते. जर आजच्या राज्यकर्त्यांचे शिवाजी महाराजांचे नावाखाली द्वेषयुक्त राजकारण करताहेत हेच राज्याचे दुर्दैव....  


टिप्पण्या