छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांच्या कुटुंबाची मुस्लिम पीर शहा शरीफ दर्ग्याची सेवा करण्याची परंपरा असताना

 छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांच्या कुटुंबाची मुस्लिम पीर शहा शरीफ दर्ग्याची सेवा करण्याची परंपरा असताना आणि ती पुढच्या पिढीने म्हणजे दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांनी सुद्धा जपली असल्याचे ऐतिहासिक उल्लेख कित्येक इतिहासकार व इतिहास अभ्यासकांच्या लिखाणात सापडतात. मालोजी राजे यांनी याच शाह शरीफ दर्ग्याला नवस बोलल्यानंतर झालेल्या या दोन मुलांची नावे त्यांनी शरीफजी आणि शहाजी अशी यावरूनच ठेवली होती असं इतिहास अभ्यासक मानतात. यावरून पणजोबांची ती परंपरा शंभु राजे सुद्धा नक्कीच पाळत/ मानत असणार. म्हणजेच मुस्लिम धर्माचा द्वेष त्यांच्यात असण्याची शक्यताच नाही. असला तर उलट आदरच असणार. म्हणजेच मुस्लिम राजे, मुस्लिम जनता यांचाही राग ते केवळ मुस्लिम होते म्हणून ते करत नसणार. केवळ  साम्राज्य विस्तार हाच लढायांमागचा हेतू होता. 


यावरून औरंगजेबाने संभाजी महाराजांना मुस्लिम बनण्याची ऑफर दिली असती तर ती धुडकावून मृत्यूला सामोरे जाण्यापेक्षा प्रजेच्या व स्वराज्याच्या हितासाठी त्यांनी मुत्सद्दीपणा / चाणाक्षपणा दाखवून ती ऑफर स्वीकारली असती व अनुकूल वेळ येताच त्यांनी तो धर्म त्यागून पुन्हा स्वगृही परतले असते. नेताजी पालकर यांच्या बाबतीत हे आधीच घडले होते. खुद्द शिवरायांनी त्यांना परत हिंदू धर्मात आणले होते. त्यामुळे असं ढळढळीत उदाहरण समोर असताना संभाजी राजे मात्र अशी ऑफर धुडकावून क्रूर मृत्यू स्वीकारतील हे लॉजिक पटण्यासारखे नाही. 


इस्लाम विषयी त्यांच्या मनात राग असण्याचे कारण नव्हते. आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचा इस्लाम विषयी आदराची भावना असण्याचीच शक्यता होती.


त्यामुळे औरंगजबने इस्लाम स्वीकारण्याची ऑफर धुडकावली म्हणून संभाजी राजांना हाल हाल करून मारले हे तर्कसंगत वाटत नाही. तसे असते तर औरंगजेबाने संभाजी महाराजांचे पुत्र शाहू आणि संभाजी राजे यांच्या पत्नी यांना सुद्धा अटक केलेली असताना त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्याची जबरदस्ती सहज केली असती. उलट औरंगजेबाने त्यांच्या केसालाही धक्का न लावता त्यांना सन्मानाने नजर कैदेत ठेऊन त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. शाहूंचे तर हिंदू वधूशी लग्न सुद्धा लावून दिले. पुढे औरंगजेबाच्या मृत्यू नंतर या दोघांनाही सोडून देण्यात आले. कारण या दोघांचा काहीही अपराध नव्हता.


पण मग त्याच औरंगजेबाने संभाजी राजांना मात्र अमानवीय पद्धतीने अत्यंत क्रूरपणे कसे व का मारले? या आधी किंवा नंतर त्याने असा भयावह मृत्यू कुणाला दिला होता का? औरंगजेबाने तर त्याच्या स्वतःच्या वडिलांना अटक करून स्वतःच्या भावांना ठार मारून सिंहासन हस्तगत केले होते. पण तिथे ही त्याने अशी क्रूर पद्धत वापरली नव्हती. 


बरं अशी क्रूर पद्धत कुराणात तरी सांगितली आहे का? तर त्याचे उत्तर नकारात्मक आहे. मग या क्रूर हत्येची शिक्षा कुठल्या पुस्तकात सापडते? तर त्याचे उत्तर आहे मनुस्मृतीत!! शूद्राने संस्कृत वेद मंत्र वाचले / बोलले,  अभ्यासले, ऐकले तर त्याचा असा छळ करावा. तसेच शूद्राने किंवा अगदी राजाने ब्राम्हणास शिवी दिली, मारले, ठार मारले तर सुद्धा त्या शूद्राला याच प्रकाराची शिक्षा मनुस्मृतीत सांगितलेली आहे. राजाने सुद्धा ब्राह्मणाला अशा प्रकारची शिक्षा केल्यास त्याचे राज्य धुळीस मिळवावे असे सुद्धा मनुस्मृतीत सांगितले आहे. संभाजी महाराजांनी यातलं सगळंच केलं होतं. संस्कृत शिकले, बोलले, लिहिले होते, ब्राम्हणास शिक्षा आगदी मृत्युदंड सुद्धा दिला होता.  त्यामुळे संभाजी महाराजांचा निर्घृण खून याबरहुकूम झालेला आहे असे मानण्यास जागा आहे. कारण याआधीही त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. गुढगी या अगम्य रोगाचं गौडबंगाल लक्षात घेतलं तर अगदी शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू सुद्धा असाच विषप्रयोगाने केला असण्याची जास्त शक्यता आहे. आणि या दोन्ही छत्रपतींचे स्वराज्यातील छुपे शत्रू ब्राह्मण होते हे वाई येथे अफजलखानाच्या विजयासाठी व शिवाजी महाराजांच्या पराभवा साठी/मृत्यू साठी कोटीचंद यज्ञ करून त्यांनी ते सिद्ध केलेलं आहेच!


संभाजी महाराजांना संगमेश्वरला सरदेसाईच्या वाड्यात बोलावून घेणे, त्याची खबर मुघलांना देणे, तिथे त्यांना दगा देऊन मुघलांच्या ताब्यात देणे आणि मग आपला बदला पूर्ण करणे या घडामोडी लक्षात घेतल्या तर या कटामागचे खरे सूत्रधार ब्राह्मण आहेत हे लपून रहात नाही. 


झोपलेल्याला जागं करता येतं. मात्र झोपेचं सोंग घेणाऱ्याला मात्र जागं करता येत नाही!!

टिप्पण्या