अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम समाजावर सतत एकतर्फी पोलीस कारवाई साठी कोणता कायदा आहे की अलिखित आदेश वा दबाव अहमदनगर जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट करावे.
काल राहुरी तालुक्यातील गुहा येथे मशिदी समोर कीर्तन बंदोबस्तास असलेल्या पोलिसांसमोर स्पीकरच्या मोठ्या आवाजात सुरू होते. कधीही न होणारे किर्तनाचा कार्यक्रम अचानक होते तेही मोठ्या आवाजात पोलिसांनी त्यास रोकले का नाही ?
कोणाच्या घरात आजारी असेल,लहान मुले असेल म्हणूनच आवाज जर मोठा असेल तर कमी आवाज कमी केला असता तर काय कमीपणा झाला असता ?
संत आणि भगवंत किर्तनातून सांगायचे नसतात तर संता सारखे आचरण आणि अनुकरण स्वतसुद्धा करायचे असतात.किर्तनकार महाराजांनीच्या सांगण्याला ना मुसलमानांने ना हिंदूने विरोध केला नसता.आणि मोठा अनर्थ टळला असता.
सज्जनांच्या संगती होय मोक्षगती दुर्जनाच्या संगती न कोरे देवा.असे असताना महाराजा समोर दंगल होत असेल तर प्रश्न कोणाला किती धर्म समजला.
राहुरी तालुक्यातील गुहा येथील वादग्रस्त दर्गातील पोलीसाने CCTV कॅमेरे काढले
राहुरी तालुक्यातील गुहा येथील वादग्रस्त दर्ग्याचे परिसरातील दोन गटातील स्पीकरच्या आवाज वरून वादविवाद हाणामारीत बदलले .एका मोठया जमावाने परिसरातील राहिवाश्यावर आक्रमण करत विटा दगडाचा मारा सुरू होता.दिसेल त्यास मारहाण करीत मशीदवर दगडफेक मशिदीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातोडफोड पोलिसांच्या समोर सुरू होती.
दुसरी कडे प्रत्येक धार्मिक स्थळावर CCTV ट्रस्टीज ने बसवून घ्यावे असे पोलीस प्रशासन सूचना करताहेत असे असताना अचानक गुहा येथील मशीद मधील डीआरर्स दर्गाह मधील CCTV कॅमेरा राहुरी पोलीस उंडे शिपाही काढताना दिसत आहे.
पोलीस कॉन्स्टेबल उंडे यांनी CCTV कॅमेरा कोणाच्या आदेशाने काढला आणि संवेदनशील भागातील CCTV काढण्याचे कारण काय?
अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब राकेश ओला यांची दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षे बाबत जाकीर शिकलकर नेतृत्वाखाली
मुसलमान समाजाचे शिष्टमंडळाने भेट घेतली असता कोळगाव थडी येथील कुराणाच्या प्रति फाडल्या प्रकरणी आरोपी शोध का लावत नाही या विषयी पोलीस अधीक्षक यांना विचारले असता.
पोलीस अधिक्षक राकेश ओला म्हणाले " मशिदीत CCTV कॅमेरे लावले असते तर आरोपी शोधणे सोपे झाले असते.कुराणाच्या प्रति मशिदी बाहेर फाडण्यात आले."
मशिदीत CCTV नसल्याची तक्रार पोलीस अधिक्षक साहेब करतात अन गुहा येथील दंगली नंतर मशिदीतील CCTV राहुरी पोलीस घेऊन काढून जातात. तेही संवेदनशील परिस्थिती निवळी नसताना
राहुरी पोलीस कॉन्स्टेबल उंडे यांचा कॅमेरा काढण्याचा उद्देश काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
असुरक्षित मुस्लिम अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची ?
पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब खुलासा करणार का?


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा