समनापूर दगडफेकी नंतर गोर गरीब सर्वसामान्य जिल्ह्यातील मुसलमानांच्या सुरक्षितते चे काय?
समनापूर दगडफेकी नंतर गोर गरीब सर्वसामान्य जिल्ह्यातील मुसलमानांच्या सुरक्षितते चे काय?
महाराष्ट्रात हिंदूंवर होणारे कथित वेगवेगळे अत्याचार, कथित लव्ह जिहाद आणि धर्मांतरण ,संगमनेरातील जोर्वे नाक्यावर दोन टोळक्यात झालेली झालेली जीवघेणी मारहाण वाद आपआपसात मिटल्या नंतर ही जातीय रंग देण्यात आला या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने संगमनेरात भगवा निषेध मोर्चा काढण्यात आला.
आयोजकांनी मोर्चा शहरात शांततेत पार पाडला.विविध अटी लादलेल्या या मोर्चाचे आयोजन व्यवस्थितपणे करण्यात आले होते. सकाळी मोर्चा सुरू होऊन तो प्रांत अधिकारी कार्यालयावर येईपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता. मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मोर्चामध्ये महिला तरुणी सहभागी होत्या. घोषणा दिल्या जात होत्या. संपूर्ण मोर्चा सभा स्थानी येईपर्यंत शांततेत पार पडला होता.आयोजकांच्या विविध अटीत दोन समाजात तेढ निर्माण होणाऱ्या हिंदू तरुणांची माथी भडकविणाऱ्या सुरेश चव्हाणके च्या भाषणाचा समावेश नसेल बहुधा.सुप्रीम कोर्टाच्या हेट स्पीच वरील कारवाई चे आदेश आहे.पण हेट स्पीच करण्याबाबत बंदी आदेश नसेल बहुधा. मोर्चा सुरू होण्याच्या आधी घडलेल्या काही घटनांमुळे संगमनेरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चा सुरू होण्याआधी दिल्ली नाका तीन बत्ती चौक या ठिकाणी एका मुस्लिम व्यक्तीचे दुकान सुरू असल्याचे पाहून भगव्या टोप्या आणि उपरणे घातलेल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या दुकानात घुसून तोडफोड केली. बळजबरीने त्यास दुकान बंद करण्यास भाग पाडले.पोलिसांच्या सतर्कते ने मोर्चा पार पडला असे म्हणावयास हरकत नाही.
मोर्चात सुरेश चव्हाणके यांनी प्रक्षोभक भाषण म्हणजे हेट स्पीचने तरुणांची माथी भडकल्याने मोर्चा संपल्यानंतर गावाकडे परत जात असताना समनापुर मुस्लिमवस्तीवर मोर्चेकरी युवकांनी घोषणा दिल्या आणि भगवा उपरणे घातलेल्या संतप्त तरुणांनी दगडफेक सुरू केली आणि त्यातून मुस्लिम व्यावसायिकाचे हॉटेलची तोडफोड करण्यात आली आणि निरपराध लोकांना मारहाणही करण्यात भगव्या मोर्चाला हिंसक कृत्यांचे गालबोट लागले असल्याचे सांगितले जाते. मात्र समनापुर मधील घटना ही बंदोबस्तासाठी असलेल्या एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलिसांसमोर घडली आहे. घटना घडत असताना त्या पोलीस निरीक्षक साहेबांनी नेमकी काय कामगिरी केली हे सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून दिसून येत आहे. पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेणे आवश्यक आहे.
अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम समाजावर सतत होणाऱ्या हल्ल्याने समाजाच्या सुरक्षितते जबाबदारी कोण घेणार एक ना अनेक सवाल
अहमदनगर जिल्ह्यात सतत होणारे हल्ल्याने मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण.
हेटपिच करणाऱ्या सुरेश चव्हाणके याला सभेसाठी पोलीस प्रशासन परवानगी दिली कशी.
राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री भयभीत मुस्लिम समाजाच्या सुरक्षे बाबत काही बोलणार का?
सुप्रीमकोर्टाचे आदेशानुसार पोलीस हेटस्पीच करणाऱ्या कारवाई का करत नाही.
अहमदनगर जिल्ह्यात सतत मुस्लिम समाजाला टार्गेट करत नियोजन पध्दतीने काही जातीयवादी दहशतवादी संघटना मुस्लिम वस्ती, धार्मिक स्थळे,सामूहिकरित्या हल्ले करून दगडफेक,दुकाने वाहने आगजनी करत दहशत माजवत आहे.या बाबत मुस्लिम समाजाचे काही जबाबदार कार्यकर्ते जिल्हापोलिस अधिक्षक ओला यांना भेटून निवेदन देऊन समाजाच्या सुरक्षितते मागणी करताहेत पण आठवडा पंधरा दिवसात जातीयवाद्याचा जिल्ह्यात कुठेना कुठे,मुस्लिमविरोधी तरुणांचे मोर्चा चव्हाणके सारखी कुप्रसिद्ध मुस्लिम विरोधी डोके भडकवणारी भाषणे पोलिसांच्या साक्षीने होतात. मुस्लिम वस्ती,धार्मिक स्थळा वर भडककेला तीस चाळीस तरुणांचा जमाव मुस्लिम विरोधी घोषणाबाजी करत दगडफेक करत आहे. घटनास्थळी असलेले दोन चार बेबस पोलीस हातात काठी घेऊन उभे दिसतात आणि पोलिसांनी केलेल्या तक्रारीत मुस्लिम तरुण दंगल खोरांच्या यादीत कारवाई होताना पकडले जातात.आज चव्हाणकेच्या भाषणानंतर समानापूर येथील सोशल मीडियावर वडापाव कीर्ती सर्वदूर पसरणाऱ्या चाचाच्या दुकानावर हल्ला करताना समाजकंटकानी दगडफेक केली. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,कायदा सुव्यवस्थाचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ओलाजी गोर गरीब सर्वसामान्य मुस्लिम समाजाच्या जिल्ह्यातील मुसलमानांच्या सुरक्षितते चे काय?
संगमनेरचे आमदार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भगवा मोर्चाच्या संदर्भाने एक पत्र काढून जनतेला विनम्र आवाहन केले होते की संगमनेर मध्ये असलेले विकासाचे आणि बंधू भावाचे वातावरण कौतुकास्पद आहे. आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात. मात्र हे चांगले वातावरण बिघडवून संगमनेरला अस्थीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे नाकारता येणार नाही. याच घटकांकडून जोर्वे नाक्यावर घडलेल्या घटनेकडे संधी म्हणून बघितले जात आहे.
सतत जिल्ह्यात होणाऱ्या दंगलींमध्ये सर्वसामान्य होरपळून निघत आहे.जिल्हात अनेक वर्षांपासून दोन्ही समाजाच्या नेत्यांनी आणि नागरिकांनी सामाजिक सलोखा राखण्याचे कासम केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र हिंदू मुस्लिम शांतता नांदत होती. किरकोळ घटना वगळता कोणीही मोठे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र आता व छोट्या घटनेने धर्म खतऱ्यात येतो असा भ्रम समाजकंटक फैलावत असल्याने शांततेचा बळी’ गेला असल्याचे दिसून येत आहे. हा शांततेचा बळी घेण्यासाठी कट्टर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पुढाकार घेताना दिसून येते. आणि त्यास राजकीय पाठबळ तर मिळत आहे.म्हणूनच जिल्ह्यातील मुस्लिम घाबरून आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा