मुख्य सामग्रीवर वगळा

मुस्लिम पत्रकाराने मूग गिळून बसू नये, लढाऊ पत्रकार हवेत

 


Uncategorizedविशेषसंपादकीय

मुस्लिम पत्रकाराने मूग गिळून बसू नये, लढाऊ पत्रकार हवेत

अफझल सय्यद(संपादक)
मुस्लिम समाजात जे बदल घडतात, ते वर्तमान पत्राच्या स्तंभलेखातून बातम्यांतुन उमटायला हवेत. पत्रकारांनी मूंग गिळून बसू नये, अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट होईल. पत्रकार नव्हे, तर लढाऊ पत्रकार हवेत. पत्रकारांनी मूग गिळून बसल्यास काहीही अर्थ नाही, ते समाजासाठी उपकारक आहे.
प्रत्येक जाती धर्मात आपआपल्या समाजिक जागृती साठी बहुतांश पत्रकार एक मोलाची भूमिका बजावत आहे.त्याच बरोबर समाजही त्यांचा उपयोग करून घेत आहे. मात्र मुस्लिम समाजाचा बाबतीत समाजातील लेखक आणि पत्रकार यांच्यात मोठ्या प्रमाणात समन्वयाचा अभाव आहे.


पुस्तके,वर्तमान पत्र,आधुनिक कालातीत इलेक्ट्रॉनिक माध्यमे, मोबाईल द्वारे सेकंदासेकंदाची माहिती आपल्या हातात पोहचविण्याचे काम करणारे समाज माध्यमातील काम करणारे लेखक,पत्रकार समाजातील बदल घडवून आणण्यासाठी महत्वाची भूमिका निभावतात. या बद्दल सर्वांचे एकमत राहील याची मला खात्री आहे.
आज समाजात काय चालले,जातीपातकाय घडते, आंतरराष्ट्रीय पातळीवर काय हालचाल आहे.या सर्वाची माहिती आम्हांपर्यंत योग्यरित्या मिळत आहे.ते पोहचविण्याचे माध्यमातून लेखक, पत्रकार पोहचविण्याचे कार्य अहोरात्र करतात.एक मोठा वर्ग आंतरराष्ट्रीय पातळीवर राबत आहे.


पत्रकार म्हटला की तो जनमानसात सहजपणे मिसळणारा आणि सर्वोतोपरी वेगवेगळ्या अंगाने माहिती संकलन करणारा,विविध व्याख्याते ऐकून आपल्यापरीने बातम्या व लेखातून सर्वांसमोर ठेऊन ते वाचल्यानंतर एक सकारात्मक आणि नकारात्मक मानसिकता बनविण्याचे सामर्थ्य पत्रकारात असते.
भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत वर्तमान पत्राचा मोठा वाटा आहे.या मध्ये उर्दू पत्रकारितेही मध्यवर्ती होती. भारत स्वातंत्र्य नंतर 1950 पर्यंतऊर्दू वर्तमान पत्राची संख्या सत्तर पेक्षा जास्त होती तर हिंदी ची संख्या सुमारे पंधरा होती.या वरून मुसलमान लेखक आणि पत्रकारितेचा प्रभाव जनमानसात प्रभावी दिसत होता.या इतिहासाची आज देशातील मुसलमानांची असलेली अवस्था पाहून आठवण करून देणे महत्वाचे ठरते.


मुसलमान म्हटले की ऊर्दू, आज ऊर्दू दम तोडत आहे.ऊर्दू वाचक हा आज ऊर्दू वर्तमानपत्रा साठी वाळवंटात एखादा सुरवंट दिसल्यागत झाली.म्हणजेच ऊर्दूचा पत्रकारांने,स्तंभ लेखकाने लिहिलेला समाजाभिमुख लेख हा मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोकांसाठी आधुनिक युगातही ‘काला अक्षर भैस बराबर’ ठरत आहे.
ऊर्दू बचावाचा मोठा नारा ज्यांनी लगावला त्यांची मुले,नाती मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमात शिकली आणि शिकत आहे.ही एक विडंबना आहे.या वरून वादविवाद करून म्हणजेच पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर काहीच उपयोग नाही.


मुस्लिम समाजात मोठे बदल घडत असताना पत्रकारीतील भाषिक बदल ऊर्दू वाचकांना स्वीकारणे आज ही अवघड ठरते. भाषा बदलाने झालेला मोठा तोटा झाला.ऊर्दू भाषा रोजगारासाठी मारक ठरली,प्रादेशिक भाषा बदल शालेय शिक्षणात स्वीकारणे अवघड आजही आहे.आज महाराष्ट्रात विचार केला तर मराठी शाळा बंद होत आहे. इंग्रजी कडे झुकाव आहे.कारण पोटाची भाषा नव्हे तर प्रगतीची भाषा म्हणून बऱ्याच वर्षांनंतर मराठी कडे मोठ्या प्रमाणात वळलेल्या मुसलमाना पुढेही पुन्हा तोच प्रश्न?
मुस्लिम पत्रकारांनी भाषिक बदल स्वीकारला.कोणी इंग्रजी,कोणी मराठी मध्ये आपलं प्रस्त बसवत असतांना मात्र समाजासाठी साठी काही मार्गदर्शक लिहू अथवा दाखवू शकले नाही.तसेच जे कोणी संपादक ,मालक असतांना देखील एक रकाना देखील मुसलमानांसाठी मार्गदर्शक लिहुच शकले नाही.


जे काही बोटावर मोजण्याइतके साप्ताहिक मराठीत प्रकाशित करण्यात आले होते असे म्हणण्याची वेळ आली, ते फक्त इस्लाम धर्माच्या माहितीसाठी होते.त्यांनी पत्रकार म्हणवून आपल्याला स्वीकारले नाही ही वास्तविकता आहे. असे असतांना इतर भाषिक मुस्लिम पत्रकारांनी लिहिण्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य नसल्याने शांत राहणे कबुल केले. तर काहींनी गाऱ्हाणी मांडली. बदलत्या काळानुसार ऊर्दूची पत्रकारितेत बदल न झाल्याने मोठे नुकसान मुस्लिम समाजास भोगावे लागले.


आज जाती धर्माने मुस्लिम बहुभाषिक पत्रकारांनी आपली पत्रकारिता समाजासाठी कशी लाभदायक ठरेल या साठी एकत्रितरीत्या बसून चिंतन विचार करणे आवश्यक आहे.मला आठवते एका ऊर्दू पत्रकाराने कायद्याचा कसा दुरूपयोग मुसलमाना विरुध्द केला जातो या बाबत सविस्तर लिहिले होते. नेतृत्व करतांना तसेच पत्रकारिता करतांना मला ते कित्येक वर्षांपासून उपयुक्त ठरले आणि काल परवा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर जिल्ह्यातील होणाऱ्या हिंदू मुस्लिम वादात मुस्लिम दोषी कसा या आंदोलना पर्यंत झाला.


आज मुस्लिम समाजाला लढाऊ पत्रकारांची गरज आहे.पत्रकार समाजात बदल घडवतात.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात उभे राहावयास हवे .मुस्लिम समाजात जे बदल घडतात, जे बदल लादले जाते ते वर्तमान पत्राच्या स्तंभलेखातून बातम्यांतुन उमटायला हवेत. पत्रकारांनी मूंग गिळून बसू नये.पत्रकारितेने काळाबरोबर कूस बदलली आणि नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपले विचार, सामाजिक बदल, विकासाच्या वाटा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचत असताना निव्वळ संधीच्या नावाने रडगाणे रडणे कितपत योग्य आहे.


तर चला मुस्लिम समाजातील बहुभाषिक पत्रकारांनी सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे.
तर सुरवात मी केली आहे, तुम्ही सुद्धा करा

टिप्पण्या