मुख्य सामग्रीवर वगळा

शेवगावातील निर्दोष मुस्लिमावरील राजकीय दाबाखालील कारवाई पालकमंत्री थांबवा,मुख्यमंत्री होण्यासाठी मुसलमान दुवा करेल…

 


शेवगावातील निर्दोष मुस्लिमावरील राजकीय दाबाखालील कारवाई पालकमंत्री थांबवा,मुख्यमंत्री होण्यासाठी मुसलमान दुवा करेल…

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांना 1994 पासून ते आज पर्यंत शिर्डी मतदारसंघातील मुसलमानांनी मोठया प्रमाणात मतदान करत आले आहे.मतदान करताना मुस्लिम मतदाराने आपला पक्ष कोणता हे बघितले आणि विचारले नाही.कारण विखे घरण्यावर असलेला अतूट विश्वास जरी आपण भाजपा सारख्या हिंदुत्ववादी राजकारण करणाऱ्या पक्षात जरी आपण गेला तरी आपण मुस्लिम मतदार बरोबर कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही याचा पूर्ण विश्वास.


भाजपने आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, पालकमंत्री केलं आणि या राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचं स्थान म्हणजे महसूल मंत्रीही केलं. आणखी काय हवं आहे?असा प्रश्न जाहीरपणे राम शिंदे करताहेत तेंव्हा.मनात अनेक प्रश्न उभे राहिले.


राधाकृष्ण विखे पा.यांनी 1994मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली.त्यांच्या त्या निवडणूकी मध्ये माझा मित्र धनंजय गाडेकर हा विखे यांच्या विरोधात असताना मी स्वतः राधाकृष्ण विखे या युवकाचा प्रचार करून माझे पहले मतदान पंजाचे चित्रावर शिक्का मारत विजयी मतामध्ये माझे एक मत सामील होते.एवढंच नव्हे तर खा.बाळासाहेब विखे पा.यांना ही खासदार साठी विजयी मतात एक मत माझे ही होते.मी हे का बर सांगत आहे. मी राहाता बरीच वर्षे राहिलो खा.बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे यांच्या निवडणूकीत काम केले.विश्वास हे घराणे कोणत्याही प्रकारे जातीपातीचे राजकारण करणार नाही.म्हणूच काय आजही शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पा.यांना मुस्लिम समाज आमदार निवडणूकीत मतदान करतो.अहमदनगर शहराचा रहिवासी होऊन दोन दशके लोटली.आता आपण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात.नुकत्याच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये मी प्रश्न उपस्थित केला होता.ज्या ज्या वेळेस जातीय तणाव निर्माण होते.लोकप्रतिनिधी तणाव निवळण्यासाठी पुढे येत नाही.मुस्लिम समाजाला सर्वच जण वाऱ्यावर सोडतात.तेंव्हा आम्हाला वाटते आम्ही आमचे मत वाया घालवले.आपण मला म्हणाला आपला मुद्दा समाजाला आणि मला मधीच थांबवले. तद नंतर आपण लव जिहाद वर कारवाई साठी सतत आपल्या भाषणातून पोलिसांना धमकी वजा सूचना करत होता.त्या वेळी मी 1994 मध्ये विजयी मतदान केलेला व्यक्ती इतका बदलला आहे का?असा प्रश्न मला पडला.काल पर्वा जेंव्हा शेवगाव येथे संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी मस्जिद वर झालेल्या दगडफेकी नंतर निर्माण झालेल्या तणावानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने हिंदु मुस्लिम समाजातील लोकांना बोलावून शहरातील एकात्मता साठी ठोस पावले उचलली जातील अशी खुळी आपेक्षा होती मात्र एकाच समाजाचे गाऱ्हाणे ऐकून आपण निघून आलात. शेवगावा मुसलमानां चा निरपराध कर्ता पुरुष पोलीस कारवाईला घाबरून घर सोडून भटकत फिरतोय.

काल मुस्लिम महिलांनी होणारी पोलीस कारवाई थांबविण्यासाठी मोर्चा काढला होता.ही बात आपल्या कानावर आलीही असेल.पोलिस दडक्या आवाजात म्हणतात वरून दबाव आहे.आणि या दबावात मुसमानांवर अटकेची कारवाई जास्त आहे.म्हणजे कारवाई दबावाखाली एकतर्फी होत नाही ना!
मुसलमान आपल्याला वोट करताना आपण कोणत्या पक्षाचे आहात याचा विचार करत नाही.मात्र आपण मुसलमानावर एकतर्फी कारवाई का थांबवत नाही. मुसलमानांनी मतदान करत आमदार केलं, खासदार केलं, आपण मंत्री झाला, पालकमंत्री झाला आणि या राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचं स्थान म्हणजे महसूल मंत्रीही झाला. आणखी काय हवं आहे?असा प्रश्न कधी मुस्लिम समाजाने केला. तुम्हाला मुख्यमंत्री होण्यासाठी मुस्लिम समाज दुवाही करेल,पण पाहिले शेवगाव मधील मुस्लिम समाजातील निर्दोष लोकांवर राजकीय दबावाखालील एकतर्फी कारवाई तात्काळ थांबवावी अशी मुस्लिम समाजाची आशा आहे.

टिप्पण्या