शाहू-फुले- आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्र मुस्लिम अल्पसंख्याक समाज हा भयावह परिस्थित जगतोय...
दै. लोकसत्ता दि.8 नोव्हेंबर 2023 च्या प्रसिद्धीस केलेल्या लेखावरून 'हिंदुत्व वॉच' या संस्थेने सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक अहवाल प्रसिद्ध केला.या अहवालात मुस्लिम समाजाला लक्ष्य करणाऱ्या द्वेषपूर्ण भाषणांची नोंद घेतल्या गेल्या आहेत. त्यांच्या कामातून पुढे आलेलं निरीक्षण बघून शाहू-फुले- आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्र मुस्लिम अल्पसंख्याक समाज हा भयावह परिस्थित जगतोय,म्हणूनच काय राज्यभरात मुस्लिम समाज हा मुस्लिम संरक्षण कायदा अट्रोसिटी कायदा प्रमाणे करण्यात यावा ही मागणी जोर धरू लागली आहे. कुणी तरी हे काम करतंय हे अधिक महत्त्वाचं समजायचं ? हे वाचून आश्चर्य मात्र वाटलं नाही.
मात्र आश्चर्य वाटण्यासारखी एक गोष्ट मात्र आहे. अशा द्वेषपूर्ण भाषणांच्या सर्वाधिक, 52 पेक्षा जास्त सकल हिंदू संघटनेचे मोर्चातील द्वेषपूर्ण भाषणातून म्हणजे २९ टक्के घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत आणि निरपराध मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींना स्त्री असो वा पुरुषांना खोट्या फिर्यादीत नोंदवून गुन्ह्यात अडकले जाते आणि कोर्टात जामीन मिळू दिला जात नाही.
शाहू-फुले- आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या, पुरोगामी महाराष्ट्र राज्यात या वर्षाभरताच्या काळत हा मुसलमानांचं द्वेषाचे राजकारण मोठ्या प्रमाणात करण्यात आले आणि मुस्लिमांच्या खच्चीकरण करण्यासाठी खास कार्यक्रम राबविण्यात आले. राज्यात चार मुस्लिम तरुण बळी ठरले.या परिस्थितीचा अर्थ कसा लावायचा हे कळत नाही. महाराष्ट्र राज्यात ही अतिशय वेदनादायी परिस्थिती आहे.
सातारा जिल्ह्यातील पुसेसावलीचा मारला गेलेला युवक,अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील युवक,नाशिक जिल्ह्यातील कथित गोवंश तस्करीच्या नावाखाली होणारे हत्याकांड,शेवगावातील मशीदवर होणारी दगडफेक, संगमनेर येथील दगडफेक,मनोरी येथील मशिदीच्या तोडफोड नंतर फिर्यादी वरच दाखल होणारे खोटे गुन्हे कोळगाव थंडी येथील मशिदीतील फाडले गेलेले कुराणच्या प्रती,मशिदीत कुराण फाडले गेले नाहीत.सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले नाहीत असा पोलिसांचा वेगळाच कयास .एक ना अनेक मुस्लिम प्रकरणे मुस्लिम अल्पसंख्याकांना दहशती खाली पुरेशी आहेत
भाजपशासित राज्यांमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीविषयी काय सांगायचे इथे पोलीस उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी कितीही टोकाची द्वेषपूर्ण भाषणं केली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात.
अहमदनगर शहरात मागील महिन्यात मुस्लिम समाजाविषयी द्वेषपूर्ण भाषण करण्यात कुप्रसिद्ध असलेले हैद्राबादचा राजासिंग एका शाळेच्या मैदानात कार्यक्रमास येण्यापूर्वी शहरातील काही संघटनांनी विरोध निवेदनात द्वारे पोलिसांकडे दर्शविला होता. पोलिसांनी राजासिंग च्या कार्यक्रमा आधी मुस्लिम समाजातील लोकांना बोलावून,तुमची पोर घरात दरम्यान च्या कालावधीत या परिसरात येऊ देऊ नका अशी समज वजा सूचना केली. मुस्लिम समाजाविषयी द्वेषपूर्ण भाषण देण्यास कुप्रसिद्ध राजासिंगास अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली परवानगी आणि कायदा आणि सुव्यवस्थाच्या नावाखाली मुस्लीम समाजास समज वजा सूचनेनुसार अलिखित बंदी. कारण भाजप महायुतीचे राज्यात सरकार.
देशभरातील 'हिंदुत्व वॉच' या संस्थेच्या अहवालाचा एकंदरीत भारतातील परिस्थितीचा आढावा पाहाता, २०२३ च्या पहिल्या सहामाहीत मुसलमानांना लक्ष्य करणाऱ्या द्वेषपूर्ण भाषणांच्या (हेट स्पीचेस) २५५ घटना नोंदवल्या गेल्या. म्हणजे दर महिन्याला ४२ आणि दर दिवसाला जवळपास १.५ द्वेषपूर्ण भाषणं ! यापैकी ३३ टक्के भाषणांमध्ये मुसलमानांच्या विरोधात हिंसा करण्यासंबंधीचा थेट उल्लेख होता. जवळपास १२ टक्के भाषणांमध्ये त्यांच्या विरोधात शस्त्रं उचलण्याचं आवाहन होतं. यापैकी ८० टक्के भाषणं ही भाजपशासित राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाली होती, ज्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.
दैनिक लोकसत्ता मधून प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार गेल्या १९ महिन्यांमध्ये 'हिंदुत्व वॉच'ने १२०० हून अधिक व्हिडीओ जमा केलेले आहेत. यात अल्पसंख्याकांच्या विरोधात घडलेले गुन्हे, द्वेषपूर्ण भाषणं यांचा समावेश आहे. आणि या व्हिडीओंना लाखांमध्ये व्ह्यूज मिळालेले आहेत. त्यांच्या या कामाचं महत्त्व हे की, काही काळापूर्वी या माहितीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आणि भारतामध्ये द्वेषपूर्ण भाषणांचा जो भडिमार आलाय त्यामध्ये न्यायालयाने लक्ष घालावं अशी विनंती करण्यात आली.
या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात हरयाणाच्या नुह जिल्ह्यात धार्मिक हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. यात सहा माणसं मारली गेली. बहुतेक प्रसारमाध्यमांनी या घटनेचं वार्तांकन करताना, 'दोन जमातींमधला संघर्ष,' असं त्याचं वर्णन केलेलं असलं, तरी 'हिंदुत्व वॉच'ने यामागचं कटू सत्य समोर आणलं.
हा हिंसाचार सुरू होण्याच्या काही तास आधी विश्व हिंदू परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांनी नुहच्या मेवात शहरात मुसलमानांच्या विरोधात एक भाषण केलेलं होतं. त्याच्यासमोर बसलेल्या शेकडो लोकांना त्याने, 'आपण मेवातचा चेहरामोहरा बदलायला हवा,' असं जाहीर आवाहन केलं होतं. दंगलीमागे असलेली ही चिथावणी इतर कोणत्याही प्रसारमाध्यमाला दाखवता आलेली नव्हती.त्यामागची कारणे सर्वांना माहीत आहे.
'हिंदुत्व वॉच' नावाच्या संस्थेने. भारतातल्या धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधात होणारी द्वेषपूर्ण भाषणं आणि गुन्हे यांची नोंद घेण्याच्या उद्देशाने त्यांनी ही पाहणी केली होती. या संस्थेचे संस्थापक आहेत २८ वर्षांचे रकीब नाईक यांनी आपल्या अहवालातून ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रकीब नाईक यांना देशातील परिस्थितीचा अर्थ कसा लावायचा हे कळत नव्हते. एका बाजूला ही अतिशय वेदनादायी परिस्थिती आहे. आपल्याला जे हवं ते करायला मिळावं म्हणून यांना परदेशात स्थायिक व्हावं लागलेला एक हुशार पत्रकार एका बाजूला आहे... ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो तिथे आपल्या बातम्या येणार नाहीत म्हणून द्वेषपूर्ण भाषणांचे व्हिडीओ पुरवणारी पत्रकारांची एक टीम त्याच्यापाशी आहे.
रकीब आणि त्याची टीम टोकाच्या उजव्या विचारसरणीच्या ८०० नेत्यांचा पाठपुरावा करत आहे. देशभरातून अनेक स्त्रोतांमार्फत या त्यांचे व्हिडीओ जमा करत आहेत. आणि त्याद्वारे या देशात कोणतीही शिक्षा न होता किती सहजी, बेफामपणे आणि किती मोठ्या प्रमाणात द्वेषपूर्ण भाषण होत आहेत हे बाहेर आणताहेत. त्यांच्या ट्विटर हँडलला अगदी कमी काळातच ७५ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळालेले आहेत.
टोकाची उजवी विचारसरणी असलेल्या नेत्यांचा पाठपुरावा करण्याखेरीज, नियमितपणे व्हिडीओ पाठवू शकतील असे काही स्रोत 'हिंदुत्व वॉच' ने देशभरात निर्माण केलेले आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, यात अनेक स्थानिक पत्रकारांचा समावेश आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा