मुख्य सामग्रीवर वगळा

बिजेपीच्या आजी आजी खासदारने धर्मांतरण करुण केला होता निकाह ?

बिजेपीच्या आजी आजी खासदारने धर्मांतरण करुण केला होता निकाह ?

ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्या वडिलांचे 1978 मध्ये निधन झाले. त्यानंतर ती एकाकी पडली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही मॅन धर्मेंद्र विवाहित असल्यामुळे कायदेशीररित्या ते दुसरे लग्न करू शकले नाहीत. त्यामुळे दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नंतर लग्न केले. धर्मेंद्र यांनी आपले नाव बदलून दिलावर खान ठेवले आणि हेमा मालिनी आयशा बी बनल्या.



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली. त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी घोषित केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती.हिंदू धर्मातील असमानतेवर त्यांनी आसूड ओढले होते. शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार 14 ऑक्टोबर 1956 रोजी केला. म्हणजेच हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला म्हणजेच धर्मांतरण हजारोंच्या संख्येने उपस्थित अनुयायांसह दसऱ्याच्या दिवशी नागपूर दीक्षा भूमीत केले होते.


आज देशात धर्मांतरण विरोधी मोठा उद्रेक माजविला जात आहे.विशेष भारतात सक्तीच्या धर्मांतराचा कोणताही पुरावा नाही. हिंदूंना सक्तीने धर्मांतर करण्यात आले, असा दावा भगवा संघटना करत राहतात ही वेगळी गोष्ट आहे. प्रथमत: या संघटनांनी इतिहास बदलण्याऐवजी गांभीर्याने अभ्यासावा.धर्मांतरण भारतात काही नवीन नाही.कोणी मूळ धर्म त्यागून इस्लामचा स्वीकार करतात,कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारतात तर कोणी हिंदू धर्माचा स्वीकार भारतीय संविधानाणे दिलेल्या हक्काने आपल्या मर्जीने धर्मांतरण करतात आणि काहीजण आपल्या स्वार्थासाठी धर्मांतरण करतात.
इस्लाम धर्माचा काही सिलिब्रिटीज,काही राजकारण्यांनी कसा दुरूपयोग केला आहे.याचे उदाहरण बिजेपीचे माजी खासदार धर्मेंद्र देओल आणि आजी खासदार हेमामालिनी यांचा मुस्लिम रीतिरिवाजा नुसार झालेला निकाह.आपण भारतीय सिनेरसिक दररोज सिनेकलाकारांचे गॅसीप एक राष्ट्रीय मुद्दा म्हणून सोशल मीडिया असो वा गप्पा गोष्टीतुन चघळत असतो.यात प्रामुख्याने कोण कोणाबरोबर डेट करतोय,कुणाचा ब्रेकअप, कुणाचे लग्नसपासून ते बेबीबंब प्रत्येक घटनेचे साक्षीदार असल्यागत वादविवाद पर्यंत पोहचतो.


सिनेअभिनेता धर्मेंद्रआणि हेमामालिनी प्रेमप्रकरण सुद्धा तात्कालिकन सिनेमॅग्जीन मध्ये चर्चेचा विषय बनला होता.धर्मेंद्र याचे पाहिले लग्न झालेले होते.बात लग्नापर्यंत येऊन ठेपली.सिनेविरोधक असणाऱ्या शाहजूकपणाचे आव आणणाऱ्याची सर्व धर्मियांची इच्छा होती की जरी धर्मेंद्रचे दुसरे लग्न हे हेमामालिनीशी व्हावे.पण त्यांचा लग्नाला हिंदू धर्मचा अडथळा.पहिली पत्नी असताना दुसरे लग्ना करता येत नाही.आणि लग्ना साठी शोधला गेला बिजेपीच्या आजी आजी खासदारने लग्नासाठी केले धर्मांतरनाचा मार्ग,धर्मेंद्रचा झाला दिलावर आणि हेमामालिनी बनली आइशा ,धर्म बदलला जातीने मुसलमान बनून झाला निकाह आणि हिंदू आणि मुस्लिम लाखो सिने रसिकांच्या दिलाच्या इच्छा पूर्ण झाल्या. कोणतीही कट्टर धार्मिक संघटनाचा विरोध दिसला.उलट त्यांचा निकाह स्वीकारत समाज मान्यता दिली. लग्नानंतर घरवापसीची माहिती उपलब्ध नाही.पण बीजेपी सारख्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षाने लोकसभा उमेदवारी देत निवडून सुद्धा आणले.


हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन यांचा अनुराधा नामक स्वीय साहायक वर जीव जडला.दुसऱ्या लग्नासाठी राजकींय प्रतिष्ठापणाला लावत धर्मांतरण केले.चंद्रमोहनचा चाँद मोहम्मद आणि अनुराधा झाली फिजा आणि झाला निकाह.काही दिवस मुसलमान म्हणून संसार केला.राजकीय महत्वाकांक्षे पायी हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि पाच वेळा आमदार राहिलेले चंद्रमोहन पुन्हा एकदा चर्चेत आले मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांचा मुलगा आणि माजी हाय कोर्टा जज सुप्रीमो कुलदीप बिश्नोई यांचा भाऊ मुस्लिम धर्मातून घरवापसीची करत हिंदू धर्मात परतल्यानंतर चंद्रमोहन पुन्हा घरोघरी फिरून मत मागत होते.
धर्मांतरण करून मुसलमान बनून लाभ उठवीनारे ,आज पद प्रतिष्ठा सर्व बीजेपी कडून भोगत आहे.आणि संविधानाणे दिलेल्या अधिकारा नुसार इस्लाम धर्माचा प्रचार प्रसार करणारे खोट्या आरोपाखाली जेल भोगत आहे.एकंदरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आणि लोकशाही मूल्याची पायमल्ली नव्हे काय?म्हणतातना,

” वो कत्लभी करते है तो चर्चा नही होती, हम आह भी भरते है ,तो हो जाते है बदनाम”

टिप्पण्या